भीषण अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन

वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी

दि. १४ ऑगस्ट : विधान परिषदचे माजी आमदार व शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. ,वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भीषण अपघातानंतर विनायक मेटे यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारावेळी विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला असावा अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले. 

या अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला झालेली गंभीर दुखापत पाहता त्यांचा मृत्यू अपघातास्थळीच झाला असावा असे डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी वेळी त्याचे शरीर कोणत्याच उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांना अखेर मृत घोषित करण्यात आले. विनायक मेटे यांच्या सोबत आणखी दोन जण आहेत. एक गाडीचा चालक आणि एक सुरक्षारक्षक होता. या दोघांपैकी सुरक्षासरक्षकाला गंभीर दुखापत झाली आहे”, असेही डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.

विनायक मेटे यांच्यासोबत असलेल्या सुरक्षकाच्या लीव्हर, छाती, डोक आणि शरीराच्या काही भागांत गंभीर जखम झाली आहे. या दोघांवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत”, असेही डॉ. कुलदीप सलगोत्रा यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.