अमृत महोत्सवी दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न

इचलकरंजी : संजय आंबे

दि. 16 ऑगस्ट : रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सैनिक कुटुंबियांचा हृद्य सत्कार अरुण खंजिरे व राजेद्र मुठाणे यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रोटरी प्रकाशराव सातपुते यांच्या प्रमख उपस्थितीमध्ये करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सामुहिक राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक कै. क्रांतिवीर निजामुद्दीन काझी यांच्यातर्फे त्यांचे कौटुंबिक वारस नूरमोहम्मद काझी तर कै. सुकुमार रुक्माणा शेट्टी यांचे कौटुंबिक वारस दिलीप शेट्टी त्याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक कै. कॉम्रेड आमदार शिवगोंडा पाटील उर्फ एस. पी. पाटील यांच्यातर्फे त्यांचे कौटुंबिक वारस रावसाहेब पाटील तर कै. शंकरराव बळवंत तेलसिंगे यांच्यातर्फे त्यांचे कौटुंबिक वारस पद्माकर तेलसिंगे आणि कै. शंकरराव दादोबा सोनटक्के उर्फ गांधीजी यांच्यातर्फे त्यांचे कौटुंबिक वारस गजानन सोनटक्के यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या मनोगतामध्ये सैनिक कौटुंबियाच्या वारसांनी रोटरी प्रोबसचे आभार मानले. त्यामध्ये कौटुंबिक वारस पद्माकर तेलसिंगे व दिलीप शेट्टी यांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिक वडीलांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळीच्या कठीण आणि भयप्रद प्रसंगाचे वर्णन करत आपल्या कुटुंबियांना आलेल्या अडचणी सांगत असताना सर्वजणच भावुक झाले होते. त्यानंतर सर्व सभासदांना राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले.
प्रमुख पाहुणे अरुण खंजिरे यांनी आपल्या मनोगतामध्ये देशभक्त कै. बाबासाहेब खंजिरे यांच्या क्रांती लढ्यातील आठवणींना उजाळा दिला आणि रोटरी प्रोबसने हा कार्यक्रम घडवून स्वातंत्र्यवीरांना मानवंदना दिल्याबद्दल आदर व्यक्त केला. राजेंद्र मुठाणे यांनी इचलकरंजी शहर क्रांती लढ्यामध्ये पुढाकारांनी सहभागी होते त्यामध्ये गांधी कॅम्प अग्रभागी होता असे सांगत आपल्या वडिलांच्या स्वातंत्र्यलढ्यामधील आठवणी सांगितल्या. रोटरी प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी, यावेळी क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवीत असताना आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सैनिक कुटुंबीयांचा यथोचित सत्कार हा क्लबच्या दृष्टीने बहुमान आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये क्लब वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित राहील असे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत क्लबचे उपाध्यक्ष शिवबसू खोत यांनी केले. पाहुण्यांची ओळख क्लबच्या जॉ. सेक्रेटरी वर्षा कुलकर्णी यांनी करुन दिली. प्रास्ताविक क्लबच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता होगाडे यांनी केले. प्रमुख पाहुणे अरुण खजिरे यांचा सत्कार मोहन भिडे तर राजेंद्र मुठाणे यांचा सत्कार अजित कोईक यांनी केला. आभाराचे कार्य क्लबचे सेक्रेटरी सुनिल कोष्टी पार पाडले. सूत्रसंचालन क्लबच्या सौ. शारदा कवठे यांनी केले. यावेळी काशिनाथ जगदाळे, धनपाल बिंदगे, विजय पवार, सौ. सुवर्णा प्रकाश पाटील, सौ. महादेवी खोत, सौ. संगीता लडगे, अशोक देगावकर यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रदीप लडगे, डॉ. प्रकाश पाटील, दिलीप शेट्टी, सुरेश काजवे, बाळासो देवनाळ, सौ. मनीषा कोष्टी, सौ. शालिनी जगदाळे, सौ. जयश्री पुजारी, सौ. शैलजा सौदीमठ, सौ. सुजाता कोईक, सौ. हेमल सुलतानपुरे, हेमंत कवठे, अण्णासाहेब पाटील, एम. के. कांबळे, विजय बनसोडे, माजी अध्यक्ष विलास पाडळे, गजानन शिरगुरे, विजय हावळे, अविनाश खोत, दिलीप भंडारे, गजानन सुलतानपुरे, प्रकाश अकीवाटे, सौ. कुसुम कोष्टी, शुभांगी कोष्टी यांचेसह सभासदांची उपस्थिती होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.