डीकेटीईकडून अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा चेक सुपुर्त

इचलकरंजी : विजय मकोटे

दि. १७ ऑगस्टः डिकेटीईमध्ये अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनानिमित्त ध्वजारोहन शहीद जवान विनय बाबासो भोजे यांच्या विरपत्नी माणिक विनय भोजे व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते झाले. हिमाचल प्रदेश येथील पठाणकोठ येथे सेवा बजावत असताना महाराष्ट्राचे तिळवणी ता. हातकणंगले येथील सुपुत्र विनज भोजे यांना विरमरण आले होते. १७ जानेवारी २०२२ रोजी डयुटीवर असताना ते शहीद झाले. ध्वजारोहन झालेनंतरच्या कार्यक्रमात त्यांना डीकेटीई परिवार यांच्यातर्फे हौताम्य वंदन व सैनिक परिवारास कृतज्ञतानिधी समर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते विरपत्नी श्रीमती माणिक विनय भोजे व कुटुंबीयाकडे मदतीचा चेक सुपुर्द करण्यात आला.
डीकेटीईने समाजाशी बांधिलकी जपतङ्क्ष देशसेवेसाठी आपल्या बलिदानाची आहुती देणा-या महाराष्ट्रातील वीरपुत्र विनज भोजे यांना श्रध्दांजली अर्पण करावी व स्वातंत्रेचे अमृतमहोत्सवी वर्ष या हेतुने शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयास कृतज्ञतानिधी देण्याचे ठरविले होते.
शहीद विनज भोजे यांच्या वीरपत्नी माणिक यांच्या हस्ते ध्वजारोहन करुण भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. ए. आर. बलवान यांनी प्रास्ताविक केले. कर्तव्याप्रती भावना ठेवून शहीद जवानांच्या कुटुबिंयाच्या दुखाःत आम्ही सहभागी आहोत व संपुर्ण देश शहीद जवान विनय भोजे कुटुंबीयांच्या पाठीशी आहे देशाच्या सीमेवर जवान कार्यरत असतात म्हणून सर्व जनता सुरक्षित असते. अशी भावना यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी केली.
यावेळी बोलताना भोजे कुटुंबीयांचे प्रतिनीधी प्रा. एस. जे. पाटील म्हणाले की देशासाठी केलेले बलीदान व्यर्थ गेले नाही भाचा हुतात्मा झाल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरु शकणार नाही पण तुम्हा सर्वानी अत्मीयतेने केलेले हे योगदान यासाठी आम्ही तुमचे सदैव ॠुणी आहोत. या कार्यक्रमास संस्थेच्या सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, डॉ. राहूल आवाडे, संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक डॉ.यु.जे. पाटील, उपसंचालिका डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, ए.व्ही. शहा, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासह हुतात्मा भोजे कुटुंबीयांचे सर्व सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळी ः शहीद जवान विनय भोजे यांच्या कुटुंबीयास डीकेटीई कडून मदतीचा चेक सपूर्द करीत असताना उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, राहूल आवाडे, प्रा. डॉ. पी.व्ही. कडोले व मान्यवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.