डी.के.टी.ई. च्या इटीसी विभागातील प्रा. जयश्री खरात यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी : संजय आंबे

दि. ३० ऑगस्ट ˆ येथील डीकेटीई संस्थेच्या इटीसी विभागातील प्राध्यापिका जयश्री खरात यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व्दारे इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट ही पदवी मिळाली.  ‘पॅसिव ब्लाईंड कॉपी मुव्ह फोर्जरी डिटेक्शन टेक्निक फॉर एम्पेग-४ डीजिटल व्हीडीओ’ हा त्यांचा संशोधनाचा विषय होता.  डॉ.सौ. संगीता चौगुले, प्रोफेसर, केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन मिळाले.
गेल्या काही वर्षात डीजिटल व्हीडीओ आणि इमेजेस समाजाच्या दैनंदीन जीवनाचा महत्वाचा भाग बनले आहेत.  शिक्षणापासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत डीजिटल व्हीडीओचा प्रभावीपणे वापर केला जातो.  अगदी कोर्टात सुध्दा व्हीडीओ पुरावा म्हणून सादर केला जातो.  पण व्हीडीओ पुरावा म्हणून ग्राहय धरण्यासाठी त्याची सत्यता तपासली जाते.  त्यासाठी फॉरेंन्सिक लॅबमध्ये व्हीडीओचे परिश्रण केले जाते.  या संशोधनात व्हीडीओमध्ये केलेले फेरफार शोधण्यासाठी आणि व्हीडीओ ओरिजनल आहे की बनावट हे चेक करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे.  या संपूर्ण प्रबंधात व्हीडीओ मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरल्या जाणा-या पध्दतींचा अभ्यास करुन वेगवेगळे अल्गोरिधम विकसित केले आहे.  व्हीडीओ आणि इमेज प्रोसेसिंगच्या वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सिस्टीम विकसित केली आहे.
या संशोधनाचा फॉरेन्सिक लॅबमध्ये व्हीडीओची सत्यता पडताळणी उपयोग होतो.  तसेच सायबर सेक्युरिटी साठी पण हे तंत्र उपयुक्त आहे.  या संशोधन प्रकल्पावर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तीन निबंध आणि नामांकित जर्नल्समध्ये चार शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.
डॉ.सौ.जयश्री खरात यांना संस्थेचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले व डेप्युटी डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे विभागप्रमुख डॉ.एस.ए. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.