मोटरसायकल चोरट्यास 12 तासात अटक
शिरोळ पोलिसांना यश : गुन्ह्यातील मोटरसायकल जप्त
शिरोळ –विजय घंगेकर
दि. १ सप्टेबर : येथील पोलीस ठाण्याकडे गु.र.नं.183/2022 भा.द.वि.स. कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद नोंदविली होती. त्या अनुषंगाने शिरोळ पोलिसांनी तपास करत 12 तासात मोटरसायकल चोरट्यास मोटरसायकलीसह अटक केली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.28 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 ते 6 दरम्यान नांदणी ते हरोली रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ कडेला पार्क केलेली हिरो होंडा क्रमांक एम.एच.09 जी.डी. 5182 ही गाडी फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडी करण्याच्या इराद्याने चोरुन नेली आहे अशी फिर्याद फियादीने दिली होती. सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत मा.पोलीस निरीक्षक डी.एस.बोरीगिड्डे यांनी आपल्या पथकास सूचना देवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सांगितले होते. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याबाबत अवघ्या 12 तासाच्या आत सखोल तपास करुन गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून सदर गुन्ह्यातील संशयित इसम वाहिद रहीमान पिंजारी उर्फ नदाफ वय 27 रा.गैबी पिराजवळ, नांदणी ता.शिरोळ याला सापळा रचून नांदणी माळभाग परिसरातून शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. चोरुन नेलेली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटरसायकल नं.एम.एच.09 जी.डी. 5182 सुमारे 20 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला. सदर आरोपीला गुन्ह्याखाली अटक करुन कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली. गुन्ह्याचा पुढील तपास दिलीप कुंभार हे करीत आहेत. सदरची कारवाई मा.शैलेश बलकवडे पोलीस अधीक्षक कोल्हापूर, जयश्री गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बजरंग माने, पोलीस उपनिरीक्षक शहाजी बंडगर, पोलीस अंमलदार दिलीप कुंभार, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, युवराज खरात या पथकाने केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.