डीकेटीई ‘बेस्ट इंडस्ट्री – लिंकड् टेक्नीकल इन्स्टिटयूट – २०२१’. पुरस्काराने सन्मानित

इचलकरंजी : संजय आंबे

दि ०२ सप्टेंबर : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली (ए.आय.सी.टी.ई.) व कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सी.आय.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘इंडस्ट्री – लिंकड् टेक्निकल इन्स्टिटयूट्स २०२१’ या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. सी.आय.आय २०२१ चा पुरस्कार स्विकारणारी डीकेटीई ही इंजिनिअरींग कॉलेजमधील महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. डीकेटीई सातत्याने गेली १० वर्षे या सर्वेक्षणामध्ये सहभागी होणारी, प्रत्येक वेळेस पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळविणारी आणि तब्बल तीन वेळा हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ही देशातील अग्रगण्य इन्स्टिटयूट आहे.
दिल्ली येथे आयोजित पुरस्कार साहेळयामध्ये ‘बेस्ट इंडस्ट्री-लिंकड् इंजिनिअरींग इन्स्टिटयूट २०२१‘ हा देशपातळीवरील सर्वोच्च असा पुरस्कार डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीला मिळाला. ए.आय.सी.टी.ई.चे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे, सी. आय. आय चे डायरेक्टर सुभाजीत पोदार एआयसीटीई मेंबर सेक्रेटरी राजीव कुमार यांच्या हस्ते इन्स्टिटयूटचे डे. डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील व टीपीओ प्रा. एस.बी. अकिवाटे यांना हा पुरस्कार दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार सोहळयामध्ये प्रदान करण्यात आला.
सदर अ‍ॅवार्डसाठी डीकेटीईचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाअध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव मा.डॉ.सौ. सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिटयूटचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.