इचलकरंजी फेस्टिवलक महामॅरेथॉन स्पर्धेत ओंकार पन्हाळकर व भक्ती पाटील प्रथम

इचलकरंजीसंजय आंबे
दि. ५ सप्टेबर :  तरुण-तरुणींचा वाढता प्रतिसाद, पुढे जाण्यासाठीची चढाओढ आणि जिंकण्याची इर्षा अशा त्रिगुणी संगमात इचलकरंजी फेस्टिवल 2022 अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मर्यादीत महामॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यामध्ये पुरुष गटात ओंकार राजेंद्र पन्हाळकर याने तर महिला गटात कु. भक्ती राजगोंडा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकविला.
रविवारी इचलकरंजी विधानसभा मर्यादीत महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुलांसाठी 4 किलोमीटर आणि मुलींसाठी 3 किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे आणि इचलकरंजी फेस्टिवलच्या संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांच्या हस्ते ध्वज उंचावून करण्यात आला.
पुरुष आणि महिला दोन्ही गटात मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. लहान मुलांपासून ते युवकांपर्यंत स्पर्धक धावले. ताराराणी पक्ष कार्यालय (स्टेट बँक) येथून स्पर्धेची सुरुवात झाली. स्पर्धेमध्ये पुरुष गटात ओंकार  पन्हाळकर : प्रथम (राहुल आवाडे स्पोर्टस्), आदित्य पाटील : द्वितीय (नॅशलन स्पोर्टस) व अनिकेत माने : तृतीय (राहुल आवाडे स्पोर्टस्) यांच्यासह ओंकार नलवडे व अक्षय पोवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आल. तर महिला गटामध्ये प्रथम कु. भक्ती राजगोंडा पाटील ; प्रथम (नॅशनल स्पोर्टस कोरोची), कु. दिव्यानी सावित्री लायकर : द्वितीय (राहुल आवाडे स्पोर्टस्), कु मानसी राजेंद्र मोरे : तृतीय (राहुल आवाडे स्पोर्टस्) तसेच कु. अंजली अंबादास इग्वे व कु. अंजली शशिकांत भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेनंतर विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच सहभागी सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी फेस्टिवलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर, सचिव शेखर शहा, एम. के. कांबळे, राजेंद्र बचाटे, तात्यासाहेब कुंभोजे, राहुल घाट, सानिका आवाडे, समायरा आवाडे, नरेश हरवंदे, संग्राम सटाले, विजय गुरव आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी राजेंद्र पन्हाळकर, नितीन वाघमोरे, विनोद वाघमोरे, अक्षय आळंदे, राजू शेख, इरफान शेख आदींनी परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.