कबनूर मध्ये ज्वेलर्स दुकान जळून खाक

शॉर्ट सर्किट मुळे आग : तीन लाखाचे नुकसान

कबनूर :- चंदुलाल फकीर

दि.६ सप्टेबर :येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मुख्य चौकातील नायकवडी ज्वेलर्स या दुकानला सायंकाळी साडेचारच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली आगीत दुकानातील फर्निचरसह सोन्या व चांदीच्या दागिन्याचे नुकसान झाले  यामध्ये तीन लाखाचे नुकसान झाल्याचे कळते.

सांयकाळी ४.३०च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने दुकानातील गॅस टाकीला आग लागली होती. आग लागतात दुकान मालक नईम नायकवडी दुकान बाहेर आले बघता बघता आग संपूर्ण दुकानात पसरली त्यांनी मदतीसाठी शेजाऱ्यांना आरडाओरडा करून हाक दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ मुजावर, काका पाटील, निशिकांत पाटील, घर मालक भोसलेसह शेजारी आनंत काडाप्पा, जैनुल नायकवडी आदींनी आग विझवण्याचा आटोकाठ प्रयत्न केला आग वीजवण्यासाठी इचलकरंजी पालिकेची तसेच पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची अग्निशामक गाडी घटना स्थळी दाखल झाली या दोन्ही अग्निशामक गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र  आगीने भडका घेतल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आगीमुळे संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले तसेच सोन्याचांदीच्या दागिनेचे नुकसान झाले दुकानाचे लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दुकान मालक श्री नायकवडी यांनी सांगितले घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी दाखल झाले होते  रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.