कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर च्या 30 व्या ऊस गाळप हंगामासाठी मोळी पूजन

इचलकरंजी : संजय आंबे
दि. १७ हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 या 30 व्या ऊस गाळप हंगामाकरीता शनिवारी काटा पूजन व मोळी आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे व सौ. किशोरी आवाडे या उभयतांच्या अमृतहस्ते आणि कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, सर्व संचालक, अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काटा पूजन, मोळी पूजन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून मुहुर्त करण्यात आला.
कारखान्याकडे सन 2022-23 हंगामासाठी सुमारे 22 हजार 500 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. मागील हंगामाप्रमाणेच कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्‍यांनी चालू गाळप हंगामातही आपला नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडेच गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी केले. या हंगामात गाळपास येणार्‍या ऊसासाठी एफआरपीची रक्कम एकरकमी आदा करण्याचे यापूर्वीच जाहीर केलेले आहे. चालू गळीत हंगामासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत सर्व सभासद, ऊस पुरवठा करणारे शेतकरी, अधिकारी-कर्मचारी या सर्वांना दिपावली व गाळप हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. ऊस विकास योजनेच्या माध्यमातून कारखान्याच्या सभासदांना मागणीनुसार ऊस रोपे, ऊस बियाणे, हिरवळीची खते, रासायनिक खते, औषधांचा वेळेत पुरवठा आणि लागण व खोडवा पिकासाठी सल्ला व मार्गदर्शन कारखान्याकडून नेहमीच देण्यात येते. ऊस विकास योजनेच्या प्रभावी कार्यवाहीमुळे शेतकर्‍यांना अधिक ऊस उत्पादन मिळत आहे.
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, केन कमिटी चेअरमन डॉ. राहूल आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे आणि संचालक सर्वश्री आण्णासो गोटखिंडे, आदगोंडा पाटील, सुकुमार किणींगे, अभयकुमार काश्मिरे, दादासो सांगावे, सूरज बेडगे, शितल आमण्णावर, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, सुमेरु पाटील, जिनगोंडा पाटील, सौ. कमल पाटील, सौ. वंदना कुंभोजे तसेच सभासद अरूण ऐनापूरे, पद्माण्णा हेरवाडे, महेश पाटील, रामचंद्र काश्मिरे, कार्यकारी संचालक व सर्व अधिकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.