इचलकरंजी व्यापारी पत संस्था चेअरमनपदी सुर्यकांत साखरे; संजय वठारे व्हा. चेअरमन

इचलकरंजीविजय मकोटे
दि. १७ नोव्हेंबर :येथील इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्थेच्या चेअरमनपदी सुर्यकांत रामचंद्र साखरे आणि व्हाईस चेअरमनपदी संजय बाबुराव वठारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेची सन 2022-23 ते 2027-28 सालची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. प्रगती वागल यांचे अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये चेअरमन म्हणून  सुर्यकांत साखरे तर व्हा. चेअरमन म्हणून संजय वठारे यांची बिनविरोध निवड करणेत आली. यावेळी संचालक सर्वश्री विलासराव गाताडे, दिलीप वणकुद्रे, सुभाष तोडकर, बाळासो बरगाले, विलास चव्हाण, शशिकांत शेटके, सुभाष पाटील, आशिष पाटील, नकुल झेले, सौ. भारती शिंदे, सौ. सुवर्णा म्हेतर उपस्थित होते. सहाय्यक निवडणुक अधिकारी मकसुद सिंदी, इचलकरंजी मर्चंटस् बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील, संचालक जयप्रकाश साळगावकर, जनरल मॅनेजर दिपक काटकर हेही उपस्थित होते. शेवटी आभार संस्थेचे व्यवस्थापक विश्‍वनाथ रोडे यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.