रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन

कामगार मंत्री सुरेश खाडे यांची ग्वाही

इचलकरंजी : विजय मकोटे

दि. २३ नोव्हेबर :वस्त्रोद्योगातील महत्वाचा घटक असलेल्या यंत्रमाग कामगारांसाठी तर रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय घेऊन ते सुरु केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. त्यामुळे नजीकच्या काळात यंत्रमाग कामगारांच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळाचा निर्णय होऊन त्याचा कामगारांना लाभ मिळेल, असे आमदार आवाडे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटना आणि इंदिरा ऑटो युनियन यांच्य शिष्टमंडळाने आमदार आवाडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावर या प्रश्‍नांचा शासन दरबारी पाठपुरावा करुन ते मार्गी लावू, असे आमदार आवाडे यांनी सांगितले.
राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनीही शासनाकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे. याच संदर्भात आमदार आवाडे यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी यंत्रमाग व्यवसाट टिकला तर वस्त्रोद्योग टिकणार आहे. त्यासाठी यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्यांना आवश्यक ते लाभ देण्याची गरज आहे. या प्रश्‍नी माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणाही केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती तातडीने करुन कामगारांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी करत आमदार आवाडे यांनी विस्तृत माहिती दिली. त्यावर कामगार मंत्री खाडे यांनी राज्य शासन कामगारांच्याबाबतील सकारात्मक असून कल्याणकारी मंडळ स्थापन करुन हा प्रश्‍न मार्गी लावू अशी ग्वाही दिली आहे.
त्याचबरोबर शहरातील रिक्षा संघटनांच्या शिष्टमंडळाने आमदार आवाडे यांनी भेट घेत रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापण्यासह कोल्हापूर-सांगली-सातारा या तीन जिल्ह्यात भाडे करण्यासाठी पूर्ववत परमिट परवाना मिळवा, नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाकडून रिक्षाच्या एकूण किंमतीच्या 25 टक्के रक्कम सबसिडी म्हणून मिळावी, केएटीपी पार्क येथील पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक लवकरात लवकर सुरु करावा आदी मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे उपस्थित होते.
या संदर्भात आमदार आवाडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधत माहिती देऊन केएटीपी येथील पासिंग बे्रेक टेस्ट ट्रॅक तातडीने सुरु करण्याबाबत सूचना करतानाच इचलकरंजीत मिनी आरटीओ कार्यालय सुरु करण्या यावे असे सांगितले. तर उर्वरीत मागण्यांचा आपण शासनाकडे पाठपुराव करुन त्या मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळात रामचंद्र जाधव, मन्सूर सावनुरकर, जीवन कोळी, शिवाजी साळुंखे, खाजाहुसेन मुजावर, आनंदा गजरे, विनोद बुकशेट, उत्तम येटाळे, अल्ताफ शेख आदींचा समावेश होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.