एडस् दिनानिमित्त रॅली

रत्नागिरी दि. 01 : जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे आज जागतिक एडस् दिनानिमित्त प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा

शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचे हस्ते प्रभातफेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये , अति . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गावडे, अति . जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कुंबरे आदि मान्यंवर उपस्थित होते.

आपल्याला एडस् सारखे आजार होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. एडस् बाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आज रॅलीचे देखील त्यासाठी आयोजन करण्यात करण्यात आलेले आहे. एडस् ची

वृध्दी कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत परंतु एडस् या रोगाचे पूर्णपणे उच्चाटन झालेला नाही आणि तो करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेच असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले म्हणाल्या.

या प्रभातफेरी मध्ये रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.