05 ते 09 जानेवारी 23 पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी : विजय मकोटे

दि. २ नोव्हेंबर : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दे महासत्ताच्या सहकार्याने 05 ते 09 जानेवारी 2023 रोजी रोटरी ट्रेड फेअर चे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्लबचे चेअरमन सत्यनारायण धूत व प्रोजेक्ट को चेअरमन संजय घायतिडक यांनी आज पत्रकार परिषदेत दिले

येथील .डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 10. पर्यंत भव्यपणे साकारत आहे सदरचे रोटरी ट्रेडफेअरचे 22 वे वर्ष आहे. इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे. असे हे श्री घायतिडक यावेळी म्हणाले .यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रमासाठी वापरली जाते. गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, बेंचेस,स्वच्छतागृह, डोळयाचे ऑपरेशन, विविध वक्त्यांची व्याख्याने ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने,
विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व इतर उपक्रम घेतले जातात. या वर्षी लेडीज व जेंट्स डेस मटेरियल आर्टीफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू गृहोपयोगी उत्पादने, मोबाईल, दुचाकी व गारमेंट मशिनरी विभाग, वॉटर प्युरिफायर इ चे स्वतंत्र विभाग मांडणेत येणार आहेत. खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनविलेले खादयपदार्थाचे विविध प्रकारचे असून फूड स्टॉल असणार आहेत. आईस्क्रिम, फूट स्टॉल तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, मुलांच्याकरिता मिनि वर्ल्ड असणार आहेत. या प्रदर्शनामध्ये स्टॉलची सुबक मांडणी केली असून, नागरिकांना प्रदर्शन पाहणेकरिता रूंद व प्रशस्त रस्ते, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मॅटीनने आच्छादित तसेच चोविस तास विशेष सुरक्षा, व सीसीटीव्ही ( cctv) स्टेज शो, कराओके गाणी मिमिक्री चे उत्कृष्ठ कार्यक्रम, आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ इ चे आयोजन ही यावर्षीची खास वैशिष्टे आहेत. इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे. स्टॉल बुकींगकरिता रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन मुकेश जैन / हुंडिया (9325700145), सेकेटरी – प्रकाश रावळ (7776826500) रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी क्लबचे अध्यक्ष सत्यनारायण धूत (8830635709), सेकेटरी प्रकाश गौड (9422048658), प्रोजेक्ट को चेअरमन संजय 1 घायतिडक (9326605212) यांच्याशी संपर्क साधावा. असे यावेळी आव्हान करण्यात आले आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.