डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा स्मार्ट इन्फ्रास्टक्चर मॉनिटरींगचा अनोखा प्रकल्प विकसीत
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ०८ डिसेंबरः डीकेटीई मधील इटीसी विभागातील विद्यार्थी साक्षी मजलेकर, प्रतिक्षा महिंद आणि स्लेषा गदाळे या विद्यार्थ्यांनींनी स्मार्ट सिस्टम फॉर इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग हा अनोखा प्रकल्प प्रा. व्ही.बी. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली बनविला आहे.
जुन्या इमारती तसेच बांधकाम सुरु असताना त्या ढासळून जीवित व वित्त हानी अशा बातम्या आपण नेहमी पाहत आणि ऐकत असतो आणि असे अपघात टाळण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट होणे महत्वाचे असते कि ज्यामुळे इमारतीची वयोमर्यादा तसेच त्याला डागडुजीकरण लक्षात येते व पुढील संभाव्य धोके टाळता येतील. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या सिस्टीम मध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स तसेच वायरलेस सेन्सर कार्यप्रणालीचा वापर केला असून सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर मधील दोष कोठूनही मोबाईल तसेच कॉम्पुटरच्या साहायाने पाहता येतात यामध्ये इमारतीच्या भिंतीमधील पाण्याच्या गळतीमुळे होणारा ओलावा इमारतीमधील हानिकारक वायू, उष्णता व त्यांची घनता यांसारखे घटकांचे मोजमापन केले जाते.
विद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये स्मार्ट ब्रिक ही संकल्पना मांडली असून यामधील प्रोटोटाईप मध्ये वेगवेगळे सेन्सर तसेच आय.ओ.टी. कार्यंन्वित मॉडयुल्स बांधकामात वापरल्या जाणा-या विटांमध्ये एकत्ररित्या कसे बसवले जाउ शकतात व ते वायरलेस नेटवर्कद्वारे एकमेकांशी कसे जोडले जाउ शकतात हे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकरित्या दाखवून दिले आहे. स्वयंचलित स्मार्ट ब्रिक्स कोणत्याही प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये उदा. दवाखाने, घरे, सोसायटी बिल्डींग, बोगदे, स्टेडिएम इ. ठिकाणी वापर करुण व त्यांची अदयावत माहिती ऑनलाईन पध्दतीने घेवून भविष्यातील धोके टाळता येतात. सदर प्रकल्प निरनिराळया प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सादर केला असून विविध पारितोषिके मिळवली आहेत. डीकेटीईमध्ये दरवर्षी समाजउपयोगी नवनविन संशोधन आणि तंत्रज्ञानात आधारीत प्रकल्प बनविले जातात आणि या प्रकल्पामुळे देशपातळीवर संस्थेची अनोळखी ओळख आहे.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी प्रकल्प तयार केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांस प्र.संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे,विभा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.