बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून कबनुरात चोरी
कबनूर : प्रतिनिधी
दि .१ जानेवती : चोरट्यांनी भरदुपारी कबनूर परिसरातील सनदी मळ्यात बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून २७ ग्रॅम सोन्याचे व ४ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच २ हजाराची रोकड असा ९८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी असिफ हारुण मुल्ला (वय ३३ रा. सनदी मळा) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर परिसरातील सनदी मळा येथे आसिफ मुल्ला हे कुटुंबासह राहण्यास आहेत. ते ऑटोलूम कारखान्यात व्हिवर म्हणून काम करतात. नाईट ड्युटी संपून ते ३० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घरी आले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास ते पत्नीला दवाखान्यात घेऊन गेले होते. त्यानंतर ते थोरात चौकातील आठवडा बाजारात जावून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी मुख्य दरवाज्याला लावलेले कुलूप तुटल्याने निदर्शनास आले. त्यांनी आत जावून पाहिले असता साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून टाकण्यात आल्याचे दिसून आले. तर लोखंडी तिजोरी फोडून त्यातील डब्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरट्यांनी १५ ग्रॅम वजनाचा ६० हजाराचा सोन्याचा नेकलेस, ७ ग्रॅमचे २० हजाराचे सोन्याचे गंठण, १५ हजाराची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४ ग्रॅमची १ हजाराची चांदीची चेन व २ हजाराची रोकड असा एकुण ९८ हजाराचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.