दलितमित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन.
शिरोळ: विअज्य धंगेकर
दि .१ कारखान्याचे आद्य संस्थापक, माजी आमदार, माजी जि.प.अध्यक्ष दलितमित्र स्व.दिनकररावजी भाऊसाहेब यादव यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व.दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक बसगोंडा पाटील यांनी, स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक महेंद्र बागे व स्व.विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित संचालक, इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी व्हॉइस चेअरमन अरुणकुमार देसाई ,संचालिका श्रीमती विनया घोरपडे,बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, विश्वनाथ माने, शेखर पाटील,प्रमोद पाटील, निजामसो पाटील,अमर यादव,सौ यशोदा कोळी,सौ संगीता पाटील कोथळीकर,इंद्रजित पाटील,रणजित कदम,मलकारी तेरदाळे, दरगू माने-गावडे,बाळासाहेब पाटील-हालसवडे,रावसाहेब नाईक कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील,सेक्रेटरी अशोक शिंदे,कामगार संचालक प्रदिप बनगे दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर,पंचगंगा संचालक बाबा पाटील,अरविंद यादव,दिलीप पाटील कोथळीकर,संभाजी भानुसे,किरण पाटील कंनंगलेकर तसेच मॅनेजर फायनान्स एस.एम.भोसले, शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, सिव्हील इंजिनियर (प्रोजेक्ट) पी.एम.पाटील, सिव्हील इंजिनियर यशवंत माने,मॅनेजर पर्यावरण सुनिल पाटील, वर्क्स मॅनेजर एस.एच.संकपाळ, प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, स्टोअरकिपर एस.व्ही.शिंदे, डिस्टीलरी मॅनेजर एस.के.यादव, लेबर वेल्फेअर ऑफिसर जे.बी.देसाई, हेड टाईमकिपर आर.एम.केरीपाळे, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही.आर.इंगळे, गेस्टहाऊस इनचार्ज शक्तिजीत गुरव, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाो गावडे, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, परचेस ऑफिसर व्ही.टी.माळी, सुरक्षा अधिकारी एस.व्ही.घारगे, कामगार सोसायटी,दत्त भांडार, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ यांचे पदाधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.