कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:३०:मे:कोल्हापूर प्रतिनिधी – कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक अधिक्षक मारुती परशुराम वरुटे याच्यासह अन्य दोघांना २५ हजारां ची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
तक्रारदारांचा सेवानिवृत्ती नंतरचा रजा रोखीकरण प्रस्ताव विनात्रुटी मंजूर करतो असं सांगून सहाय्यक अधीक्षक मारुती वरुटे याने तक्रारदारां कडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती तडजोडीअंती २५ हजार देण्याचे ठरले. आरोपी वरुटे यांने ही रक्कम लोकसेवक विलास शिंदे याला स्वीकारण्यास सांगितले. त्यानुसार लोकसेवक विलास शिंदे आणि एजन्ट शिवम शिंदे हे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी २५ हजारांची लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना ताब्यात घेतलंय ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास माने, सुनील घोसाळकर, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव यांनी मिळून केलीय
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.