शिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार नवीन इमारत

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेअंतर्गत मंजूर झाले

शिरोळ:प्रतिनिधि: राम आवळे 

  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शिरोळ तालुक्यातील पाच गावातील ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला १८ लाख रुपये प्रमाणे ९० लाखाच्या निधीला मान्यता मिळाली आहे 

तालुक्यातील या पाच ग्रामपंचायतीला आता नवीन इमारती मिळणार असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,

शिरोळ तालुक्यातील टाकवडे,नवे दानवाड, तेरवाड, गणेशवाडी व शिरदवाड या गावांमधील ग्रामपंचायतीच्या इमारती उभारण्यासाठी हा निधी मंजूर झाला असल्याचे सांगताना लवकरच या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार नव्या इमारतींमधून सुरू होणार असून हा निधी मंजूर करण्या कामी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री नामदार गिरीष महाजन यांचे सहकार्य लाभले असल्याचे पत्रकात म्हंटले आहे, राज्य शासनाच्या विविध योजनांमधून या पुढच्या काळात देखील विविध योजनांमधून शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला जाईल असेही पत्रकात शेवटी म्हंटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.