सांगली:प्रतिनिधि
दि:२३:जुन:महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या कारवाईला वेग आला असून राज्यभरातील विविध शहरांमध्ये धाडी टाकल्या जात आहेत. सांगली शहरातही आज ईडीने दोन मोठ्या उद्योजकांच्या घरावर आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. पहाटेच्या सुमारास उद्योजकांच्या घरावर पडलेल्या या धाडीने शहरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या दोन पथकांतील सहा अधिकाऱ्यांनी शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे असणाऱ्या दोन व्यावसायिक भावंडांच्या घरावर छापे टाकले. पारेख बंधूंची चौकशी व घराची तपासणी करण्यात येत आहे. पारेख बंधू यांचा शहरातील गणपती पेठ येथे लाईट विक्रीचा मोठा व्यवसाय आहे. ईडीचे अधिकारी सकाळपासून तब्बल पाच तास व्यावसायिकांची कसून चौकशी करत होते.
दरम्यान, याच व्यावसायिकांवर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेतून सीमा शुल्क आणि व्हॅटच्या पथकांनी छापे टाकले होते. तर जीएसटी विभागाने कर वसूल केला असल्याची माहिती आहे. सांगलीतील या व्यावसायिकांवर चौथ्यांदा केंद्रीय पथकांचे छापे पडल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, छाप्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल झाले होते. मात्र, काही वेळानंतर तेही या ठिकाणाहून निघून गेले.
दरम्यान, सध्या ईडीचे अधिकारी जनशांती आणि विश्वास या दोन बंगल्यात असून पुढील कार्यवाही करत आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.