अजित पवार मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक मिरजेत इद्रिस नायकवडी यांनी झळकावले…सांगलीत जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम राहणार ?

सांगलीत जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम राहणार ?

­मिरज:प्रतिनीधी

दि:०४:जुलै:राजभवनामध्ये राष्ट्रवादीतील नऊ आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या चार तासात अजितदादा पवार आणि मिरजेचे जावई असलेले कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक मिरजेत झळकले. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी हे शुभेच्छा फलक झळकावले

 

इद्रिस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायवकडी हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत .गेली पाच वर्षे महापालिकेच्या राजकारणापासून अलिप्त असलेले माजी महापौर इद्रिस नायकवडी आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी नसले तरी परीघावर येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सांगली महपालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक असताना महापौर निवडीमध्ये काँग्रेसच्या मदतीने सत्ताबदल करण्यात नायकवडी कुटुंबाची मदत घेण्याविना पर्याय नव्हता

त्यावेळी सर्व काही जुळणी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केली होती, मात्र, अखेरच्या क्षणी नायकवडी यांच्या तीव्र विरोधामुळे दिग्विजय सुर्यवंशी यांना महापौरपदाची संधी मिळाली. तेव्हापासून बागवान आपला स्वतंत्र गट करण्याच्या मनस्थितीत असताना नायकवडी यांनी वेळ न दवडता अजितदादांच्या शुभेच्छाचे फलक लावले असावेत.

तसेच मिरजेच्या राजकरणात इद्रिस नायकवडी यांची मोठी भूमिका आस्ते मिरजेच्या चाणक्य महणुन इद्रिस नायकवडी यांची ओळख आहे

नायकवडी यांचे वडील स्व.जनाब इल्यास नायकवडी हे शरद पवारांचे एकनिष्ठ होते पक्ष बांधण्याचा काम स्व जनाब ईल्यास नायकवडी यांनी मोठया ताकदीने केला होता स्व. जनाब इलयास नाईकवाडी हे राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष होते

त्यांचा पावलावर पाऊल ठेऊन माजी महापौर इद्रिस नायकवडी हे राष्ट्रवादी मधे काम करत आहेत

अजित दादा यांचे विश्वासू म्हणून नायकवडी यांची ओळख आहे ­

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.