२३ निवृत्त कर्मचाऱ्यांची बँकेच्या विविध शाखांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुपूर्द केले नेमणुकीचे पत्र

जयसिंगपूर:प्रतिनिधि

दि:२३:जुलै:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील सेवानिवृत्तीमुळे व इतर कारणामुळे रिक्त झालेल्या पदांवरती अनेक वर्षे कर्मचाऱ्यांच्या नेमणुका न झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या अनेक शाखांमधून आवश्यकतेनुसार अधिकारी व कर्मचारी यांची उपलब्धता नव्हती, बँकेच्या अनेक शाखांमधील रिक्त पदांमुळे नेमणुकीवर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा बोजा वाढला होता, यामुळे जिल्हा बँकेच्या ग्राहक व शेतकऱ्यांची गैरसोय होत होती, त्यांना बँकेकडील सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यास अडथळे येत होते, ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धरतीवर बँकेकडील निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना पुन्हा सेवेत बोलावून कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू करून घेण्यास परवानगी द्यावी याबाबतची मागणी शासनाच्या सहकार आयुक्त यांच्याकडे केली होती, शासनाच्या सहकार आयुक्त कार्यालयाकडून याबाबतची परवानगी मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निवृत्त कर्मचाऱ्यांकडून यासाठीचे प्रस्ताव मागवले होते, याला जिल्हा बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला,

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रस्ताव बँकेला प्राप्त झाले होते, याचाच भाग म्हणून शिरोळ तालुक्यातील विविध शाखांमध्ये शनिवारी २३ निवृत्त कर्मचाऱ्यांची बँकेच्या विविध शाखांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली, या सर्व कर्मचाऱ्यांना नेमणुकीचे पत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सुपूर्द केले, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गावागावांमधील शाखांमधून ग्राहकांना होणारा त्रास या नेमणुका झाल्यामुळे कमी होईल आणि जिल्हा बँकेकडून ग्राहकांना या पुढच्या काळात तत्पर सेवा उपलब्ध होईल असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.