श्री आदिनाथ बँकेच्या वार्षिक सभेमध्ये शाखा विस्तार करणेचा संकल्प
चेअरमन सुभाष काडाप्पा
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:२४:जुलै:
येथील श्री आदिनाथ को – ऑप बँक लि., इचलकरंजी या बँकेची सन २०२२-२३सालाची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी श्रीमंतना.बा. घोरपडे नाटयगृह येथे खेळीमेळीत पार पडली.नाविन्यपूर्ण व लक्षवेधी विषयास एकमताने मंजूरी
बँकेचे सभासद श्री. यशवंत दाडमोडे यांनी या वर्षाचा डिव्हीडंड बँकेच्या इमारत निधीस वर्ग करून या निधीचा वापर करून बँकेचे कॉन्फर स हॉल बांधावे व पुढील वर्षी चांगला डिव्हीडंड द्यावा अशी सुचना मांडली त्यास सभेने मंजूरी दिली.
सुरुवातीस आद्यतिर्थकर आदिनाथ भगवान व संस्थापक स्व. आप्पासो मगदूम यांचे फोटोचे पुजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ संचालक श्री. बाळासो पारीसा चौगुले यांनी केल तर श्रध्दांजली ठराव श्री. श्रेणीक दादासो मगदूम यांनी मांडला.सभेस प्रमुख पाहुणे म्हणुन सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) व मार्गदर्शक प्रकाशराव आवाडे (आण्णा) उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन मा.सुभाष आदिशा काडाप्पा यांनी ८% डिव्हडंड जाहिर केला. अहवाल सालातील बँकेच्या आर्थिक बाबींचा आढावा घेतला. तसेच सुरुवातीच्या १००० /- रूपये शेअर्स वरती बँकेने आतापर्यंत डिव्हीडंड रूपाने १९२० /- रूपयेचा परतावा दिलेचे नमुद केले
डिझीटल बॅकींग ही आधुनिक बँकींगमधील क्रांती म्हणावी लागेल. आज जग पेपरलेस कामकाजाकडे वळत आहे. त्यामुळे संगणकीकरण खर्चिक असले तरी गरजेचे आहे म्हणुन बँकेने नविन सॉफ्टवेअर व अनुषंगिक तांत्रिक बाबीं नव्याने घेऊन ग्राहकांना नवनविन पेमेंट सुविधा जसे – मोबाईल बँकींग तसेच युपीआय च्या माध्यमातून गुगल पे फोन पे क्यु. आर कोड, इ. पेमेंट सुविधा उपलब्ध केले असून सद्या ग्राहक ही सुविधा वापरत आहेत.
सध्याच्या बँकींगमधील रिझर्व्ह बँकेकडील बदल व त्याअनुषंगाने दंडात्मक कारवाई वाढलेचे दिसून येते. परंतु आपल्या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या Financially Sound and Well Managed (FSWM) -या बॅकींगमधील चांगली गुणवत्ता व व्यवस्थापन निकषामध्ये खरी उतरत आहे. यामुळे बँकेला नविन शाखा विस्तार करणेस परवनागी मिळाली आहे त्यानुसार आपली बँक लवकरच शाखाविस्तर करत असलेचा संकल्प तसेच मुख्य शाखेच्या इमारतीत दुस-या मजल्यावरती कॉन्फरन्स हॉल बांधकाम करणार असलेचे सांगितले.
आपल्या बँकेने उत्कृष्ट बँकींग कामगिरी व उत्कृष्ट बँकींग तंत्रज्ञान याच्या निकषावर आधारीत विविध श्रेणीमध्ये दरवर्षी अविज पब्लिकेशन या बँकींग टीअर संस्थेकडून देत असलेल्या बँको पुरस्कार मध्ये या आर्थिक वर्षामध्ये प्रथम क्रमाकांच पारितोषिक मिळाले आहे. ही अभिमानाची बाब असलेचे नमुद केले.
चुकीची गुंतवणुक, फसव्या जाहिराती, कमी वेळेत जास्त मोबदला देणा-या फसव्या कंपन्या इ. मुळे लोकांच्या कडील पैसा सुरक्षित राहिलेला नाही त्यामुळे सभासदांनी यनासिअल प्लानिंग करणे व आर्थिक साक्षर होणे गरजेचे असलेचे नमुद केले तसचे कर्ज हप्ता वेळेत भरून आपला सि-बिल चांगला राखणेचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे बँकींगमधील विविध समस्या जसे राष्ट्रीयकृत बँकेच्या तुलनेने सहकारी बँकांच्या ठेव व कर्ज व्याजदरातील फरक तसेच ५०% कर्ज ही २५ लाखांच्या आतील असणेबाबत निर्देश याबाबत मत मांडले.
शेवटी सभासदांना सर्व विषयास मंजूरी देणेचे व आवाडे परिवाराचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले.
बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी कल्लाप्पाना आवाडे (दादा) सभेस उपस्थित होते. तसेच मार्गदर्शन भाषणात मा. श्री. प्रकाशरावजी आवाडे (आण्णा) यांनी स्व. आप्पासो मगदूम व व्हा. चेअरमन स्व. बाळासो केटकाळे यांची आठवण केली. डिझीटल बँकींगची गरज असलेचे व त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपग्रेड खर्च जादा असून यासाठी व्यवसाय वाढवून त्याची भरपाई करावी असे सुचित केले. त्याचप्रमाणे सभासद व संचालक यांनी निवडणुक बिनविरोध केलेबद्दल सर्वांचे अभिनंदन केले, तसेच शाखाविस्तार व डिझीटल माध्यमातून बँक मोठी करणेचे आवाहन करून बँकेच्या पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या.
तदनंतर नोटीस वाचन उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. जयकुमार उपाध्ये यांनी केले. सभासदांनी सर्व विषयास एकमताने मंजूरी दिली.
सभेमध्ये सौ. वैशालीताई आवाडे यांची दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप फेडरेशन लि.मुबई या बँकांच्या राज्यस्तरीय फेडरेशनवरती उपाध्यक्ष झालेबद्दल सत्कार करणेत आला त्याचप्रमाणे मा. स्वप्नीलजी आवाडे यांची क.आ. इचल जनता बँकेच्या चेअरमनपदी निवडीबद्दल सत्कार करणेत आला. त्याचप्रमाणे युवा नेते राहुल आवाडे यांचा विशेष सत्कार करणेत आला.
बँकेच्या डिझीटल बँकींग सेवेबद्दल माहिती व मार्गदर्शन केले म्हणुन मा. सुरेश शिरगावे व किरण चौगुले यांचा सत्कार करणेत आला. त्याचप्रमाणे चेअरमन सुभाष काडाप्पा व मधुकर मणेरे यांना साई समर्थ फांऊडेशन कडील समाज भूषण पुरस्कार मिळालेने तसेच संचालक राजू उर्फ अभयकुमार मगदूम यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झालेबद्दल
मिळालेले
तसेच समिति सदस्य त्याचप्रमाणे बँकेचे माजी संचालक डॉ. पारीसा बडबडे व श्री. शंकर हजारे यांची निवडणुक बिनविरोध करणेस सहकार्य केलेबद्दल सत्कार करणेत आला.
सभासद व कर्मचारी कल्याणयोजने अंतर्गत बँकेचे सभासद श्री. सुनिल ढोणे यांची कन्या श्रध्दा ढोणे व सभासद श्री. संजय पाटील याची कन्या सिध्दी पाटील यांचे शालेय परीक्षेतील विशेष यशाबद्दल तर बँकेचे उपमुख्य अधिकारी श्री जयकुमार उपाध्ये व ईडीपी मॅनेजर श्री. संतोष रायनाडे यांचे साफ्टवेअर कार्यान्वित करणेकामी विशेष प्रयत्न तर आदर्श कर्मचारी म्हणुन श्री. सचिन कुडचे यांचा सत्कार करणेत आला.
शेवटी आभार प्रदर्शन संचालक मधुकर मणेरे यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.