अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीं याची त्यांना पुर्वकल्पना आहे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाहीं… उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:प्रतिनिधि

दि:२४:जुलै:ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंपाबाबत बोलले जत आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट खुलासा केला आहे.

एकनाथ शिंदे हे लवकरच मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होणार असून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यातच आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा त्यास चालना मिळाली आहे. या वक्तव्यांमुळेच शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. आता यासंदर्भात फडणवीसांना विचारले असता त्यांनी माध्यमांना मोठा खुलासा केला आहे.

 

फडणवीस म्हणाले की, महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच आहेत. अजित पवार यांनाही ते माहित आहे. त्यांनीही ते स्वीकारले आहे. त्यामुळे त्यात कुठलाही बदल होणार नाही. राजकीय वावड्या उठवून काही साध्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.