मिरज सुधार समिती यांच्याकडून परशुराम बसाप्पा कोळी यांची सुभाष नगर अध्यक्षपदी निवड

मिरज:प्रतिनिधि

दि:०५:ऑगस्ट:  मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि ग्रामीण भागातील परंबलित विकास कामावर मिरज सुधार समिती जनसंपर्क कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी बैठकीत मिरज शहरातील व ग्रामीण भागातील नागरीकांच्या तक्रारी बाबत चर्चा करण्यात आली  बंद पडलेले ट्रॅफिक सिग्नल खराब रस्ते अनेक मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी समितीचे पदाधिकारी सदस्य यांनी चर्चा केली

तसेच मिरज ग्रामीण भाग व मिरज शहरातील सभासद नोंदणी साठी सभासद नोंदणीचे फार्म वाटप करण्यात आले

यावेळी मिरज सुभाषनगर अध्यक्षपदी परशुराम बसप्पा कोळी यांची  निवड करण्यात आली

यावेळी प्रमूख ए ए काझी. समन्वयक शंकर तात्या परदेशी. अध्यक्ष असिफ निपाणिकर. कार्यवाह जहीर भाई मुजावर. युवा अध्यक्ष सुभान भाई सौदागर. शकील बावा पीरजादे अल्फाज बुजरूक. उपाध्यक्ष राकेश तामगावे. अक्षय बाघमारे. गीतांजलि पाटिल मॅडम. आदि मान्यवर उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.