इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी आणि स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजीप्रतिनिधी 

दि .३१: महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी (राष्ट्रीय संकल्प दिवस) निमित्त तसेच स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
तसेच यावेळी राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त उपस्थितांच्या कडून राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेणेत आली.
याप्रसंगी उपायुक्त सोमनाथ आढाव, सहा. आयुक्त केतन गुजर, वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे, लेखा परीक्षक आरती पाटील- खोत,कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, नगररचनाकार प्रशांत भोसले, विद्युत अभियंता संदीप जाधव , संगणक अभियंता संतोष पवार, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, विधी अधिकारी खदिजा सनदी,उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, यांचेसह महानगरपालिका विभाग प्रमुख तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.