कबनूर–हबीब शेखदर्जी
दि.३ : गेले ६ दिवस मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कबनूर येथील देशभक्त रत्नप्पा कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर दिवस रात्र साखळी उपोषण सुरू होते. या उपोषणास इचलकरंजी व कबनूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, मराठा बांधव ,महिला यांनी पाठिंबा दिला. प्रा. रवींद्र पाटील यांनी या उपोषणाचे आयोजन करून कबनूर मधील सकल मराठा समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. कोणत्याही प्रकारची गैर कृत्य न होता हे ६ दिवस उपोषण शांततेत आणि कायदा सुव्यवस्था शाबित ठेवत पार पाडले .त्याबद्दल प्रा. पाटील यांनी सकल मराठा समाजाचे आभार व्यक्त केले. प्रा. रवींद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या कबनूर येथील उपोषणास सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.