अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 2 डिसेंबर अखेर वाहतुकीस बंद

 सांगली, फझल मुन्शी 

दि. 2: मिरज येथील अर्जुनवाड ते मिरज रोड वरील रेल्वे गेट LC 465 पुलाच्या कामकाजासाठी 3 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 या कालावधीसाठी वाहतूकीसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत अधिसूचना पारित करण्यात आली होती. पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने रेल्वे गेट LC 465 वरून होणारी वाहतूक वळविण्याबाबतच्या दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी पारित केलेल्या अधिसूचनेस दि. 2 डिसेंबर 2023 अखेर मुदतवाढ देण्यात आल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मोटर वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पारित केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.