गारगोटी ग्रामपंचायत वर फडकला भाजपचा विजयाचा झेंडा

प्रकाश वासकर लोकनियुक्त सरपंच

अटीतटीच्या झालेल्या सरपंच पदाच्या निवडीत प्रकाश वास्कर विजय

सरपंच गटाला ४ तर आमदार आंबेडकर गटाला १३ जागा

गारगोटी:प्रतिनिधी 

दि.६  अटीतटीच्या  झालेल्या गारगोटी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत  सरपंच पदीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई व माजी आमदार के पी पाटील यांच्या आघाडीचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार प्रकाश शंकर वासकर यांना ४५४१  मते मिळाली तर विरोधी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या गटाचे उमेदवार अरुण कृष्णा शिंदे यांना शिंदे यांना ४ हजार ४१३  मते मिळाली. १३३  मतांनी प्रकाश शंकर वासकर हे विजय झाले

.गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीने विजय मिळवून आपली सत्ता कायम ठेवली तर सदस्य पदांमध्ये विरोधी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध आघाडीने तब्बल १३ जागा जिंकून बहुमत निर्माण केले आहे.

प्रभाग व निवडून आलेले उमेदवार असे

प्रभाग क्रमांक १  (सोनाळी )

विजयी  उमेदवार – अजित भिकाजी देसाई     मते -७८५ , अनिता संजय गुरव  मते-७४६   , संध्या संतोष कुपटे   मते ८०१

प्रभाग क्र .२ ( खडक गल्ली पोकळे गल्ली) 

 विजयी  उमेदवार – पांडुरंग कृष्णा सोरटे      मते   ७६४     मेगा जितेंद्र भोसले    मते – ७४३   लता चंद्रकांत चव्हाण  मते ८८७ 

प्रभाग क्र .३   ( भुई गल्ली ,मसवे रोड)

विजयी उमेदवार  –  विक्रम मधुकर चौगुले      मते -७५४     सागर आनंदराव शिंदे   मते -७४१ 

प्रभाग क्र . ४  ( मौनी विद्यापीठ परिसर )

विजयी उमेदवार – संदीप आनंदराव देसाई     मते  -८३४    किरण अमोल कल्याणकर    मते -९३३    स्मिता सचिन पिसे    मते – ९१८

प्रभाग  क्र.५  ( शिवाजीनगर सुदर्शन नगर )

विजयी उमेदवार –  प्रशांत शिवाजी भोई  – मते ८८६     भारत कृष्णा शेटके   मते- ९१७      पायल अमोल पावले    मते-९४१ 

प्रभाग क्र .६  ९(साई कॉलनी डॉक्टर जे पी नाईक कॉलनी) 

विजयी उमेदवार – राहुल अंताजी जाधव ८४८    मंजुषा विजय माळी    मते -७४७   रूपाली दसरत राऊत   मते -७५७ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.