भाजपाच्या विजयाने इचलकरंजीत भाजप कार्यकर्त्यांकडून साखर पेढे वाटून आनंदोउत्सव, जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी…

इचलकरंजी:विजय मकोटे

  दि 4:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृवाखाली सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, तसेच  विकासाच्या मुद्यावर देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड तेलंगाना या राज्यात निवडणूक लढवली. चार पैकी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप मित्र पक्षाने भाजपने आघाडी घेत बहुमताने विजयाकडे वाटचाल केली. त्यामुळे इचलकरंजीत  भाजपा कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये (शिवतीर्थ) साखरपेढी वाटून फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष  साजरा केला.  यावेळी जल्लोष साजरा करता जय श्रीराम,जय शिवाजी जय भवानी “हर हर मोदी, घर घर मोदी” अशा घोषणा देत भाजपा कार्यालय पासून शहरातून बाईक रॅली काढुन नागरिकांना साखर वाटून एकमेकांना शुभेच्छा देत आंनदोउत्सव साजरा केला.  यावेळी शहराध्यक्ष पै.अमृत भोसले यांनी सर्वांना शुभेच्छा देत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीजी नेतृत्वात भाजपा 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येऊन पुन्हा एकदा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाची सत्ता येणार असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, जि.उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, उमाकांत दाभोळे, राजेंद्र पाटील, विनोद कांकाणी, महिला अध्यक्षा सौ.पुनम जाधव, सौ. नीता भोसले, शबाना शहा, सौ.अलका विभुते, सौ.छाया तोडकर, प्रसाद खोबरे, म्हाळसाकांत कवडे, प्रविण पाटील, सागर कचरे, अमित जावळे, अनिस म्हालदार, आण्णा आवळे, अतुल पळसुले, सुधीर पाटील, मनोज जाधव, नितीन पडीयार, अरविंद चौगुले, दिपक पाटील, उत्तम चव्हाण, सचिन पवळे, संतोष यमगर्णी, प्रवीण जाधव, आप्पासाहेब गोकावी, सार पाटील, शेखर पाटील, मारुती पाथरवड, प्रविण रावळ, प्रकाश खारगे, अविनाश लोखंडे, महादेव बडवे, राजु भाकरे, आशिष खंडेलवाल, दिलीप मुथा आदि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.