मणेरे विद्यालयामध्ये क्रीडामहोत्सव साजरा
कबनूर :हबीब शेख दर्जी
दि ६ :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बालविद्यामंदिर, सौ.कुसुमताई प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज,कुसुम ऑलिंम्पियाड अॅकॅडमी इचलकरंजी यांचे संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सन 2023-24 चा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठया उत्साहात सुरु झाला. तसेच बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिना निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे को.जि.मा.शि.माध्यमिक पतसंस्थेचे संचालक मा.श्री.श्रीकांत मधुकर कदम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे उपस्थित होते. त्याचबरोबर मान्यवर उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे हे होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रमुख पाहुणे मा.श्री. श्रीकांत कदम यांनी विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी व जीवनात सक्षम होणेसाठी शिक्षणाबरोबर खेळ व व्यायाम महत्वाचा आहे असे विचार व्यक्त केले. आपला सर्वांगीण विकास साधून शाळेचा नावलौकीक विद्यार्थ्यांनी वाढवाव अशी सदिच्छा ही व्यक्त केली.
अक्ष्यक्षस्थानी भाषणात मा.श्री.सुधाकररावजी मणेरे यांनी “शाळेच्या विकासासाठी व संस्कारमय विद्यार्थी सुजाण नागरिक बनावा यासाठी शाळा नेहमी कार्यरत असते” असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रामध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.