शरद इन्स्टिट्युटमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग परिषद संपन्न
देश विदेशातील संशोधकांचे मार्गदर्शन : ७० शोधनिबंधाचे सादरीकरण
यड्राव:राम आवळे
दि २५: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये १३ व्या इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग या परिषदेत जगभरातील संशोधकांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत २५० पेक्षा अधिक शोधनिबंध आले होते. त्यामधील निवडक अशा ७० शोधनिबंधाचे साधरीकरण झाले.यावेळी एस.आर. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिपक गर्ग म्हणाले, भविष्यात आर्टिफिशल इंटेलिजेन्स विकसित करताना मानवी मुल्ये महत्वाची आहेत. एखादे तंत्रज्ञान मानवाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणणे हे आपल्या संशोधकांचे काम आहे. शरद इन्स्टिट्युटने विकसित केलेले लॅब हे जागतिक पातळीवरील असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये आत्मसात करताना होईल.
दोन दिवशीय या परिषदेमध्ये सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. केतन कोटेचा यांनी ‘वास्तविक जगात एआयचा वापर- आव्हाने आणि उपाय’, ऑस्ट्रेलिया येथील सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी डॉ. मिना झा यांनी ‘शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर’, मलेशिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ अॅम्प्टनच्या डॉ. सागाया यांनी ‘कृषी पर्यावरण क्षेत्रात कनेक्टेड इंटेलिजन्स प्रदान करण्यात एआयचे महत्त्व’, यु.एस.ए. नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीचे डॉ. उमेश राव यांनी ‘रिस्पॉन्सेबल एआय, डिपेंडन्सी इन डेव्हलपिंग एआय सिस्टिम’, पुणे विद्यापीठाचे डॉ. अदित्य अभ्यंकर यांनी ‘रिसर्च व्हेअर अबाऊट’ या विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच डॉ. जगन्नाथ सारंगपाणी यांनी लाईफ लाँग मशिन लर्निंग फॉर रोबोटीक सिस्टिम, डॉ. प्रतिक भाटीया यांनी जनरल डाटा प्रोटेक्शन रेग्युलेशन, डॉ. अजय शर्मा यांनी एआय इन सायबर सिक्युरिटी, डॉ. यु डाँग झँग यांनी इम्प्रुव्हड व्हिआयटी मॉडेल्स फॉर मेडिकल इमेज अॅनॅलिसिस, डॉ. सुगंधम् यांनी रॅन्डमायजेशन बेसड ऑन डिप अॅण्ड शॅलो लर्निंग अल्गोरिदम, डॉ. अम्मर अलमुमाणी यांनी ऑनलीन मार्गदर्शन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.