शृंगारपुर,कापाची वाडी येथील वाघजाई देवी मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न

रत्नागिरी :नियाझ खान 

दि .२९:संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपुर ,कापाची वाडी येथील बाजी वाघजाई मंदिर जिर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटामाटात व भक्तीमय वातावरणात पार पडला. हा उद्घाटन सोहळा  प्रमुख अतिथी श्री.व.ब्र.१०८श्री.गुरु डॉ.निळकंठ शिवाचार्य महाराज (श्री क्षेत्र धारेश्वर) व मा.श्री.सुर्यकांत तुकाराम साळुंके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते रिबीन कापून  पार पडला.


या तीन दिवसांच्या जिर्णोद्धार सोहळ्याचे आयोजन नवप्रकाश तरूण मंडळ आणि कापाची वाडी ग्रामस्थ यांनी केले होते .या जिर्णोद्धार सोहळ्यास सुर्यकांत साळुंके यांचे आर्थिक सहाय्य लाभले  . यासाठी कापाची वाडी ग्रामस्थांनी साळुंके यांचे विशेष आभार मानले.
बाजी वाघजाई मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याला उपस्थित उद्घाटक मा.श्री सुर्यकांत साळुंके,मा.श्री सहदेव बेटकर ,श्री विनोद म्हस्के, कापाची वाडी सर्व ग्रामस्थ, चाकरमानी व पंचक्रोशीतील भाविक होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.