संजय गांधी निराधार समिती ने महानगरपालिका आयुक्तांना परीतक्त्या दाखलादेने बाबत दिले निवेदन
संजय गांधी समिती अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांची पत्रकार परिषदेत माहिती.
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १० :इचलकरंजी महानगरपालिका झाल्या पासून निराधार महिलांना परीतक्त्या दाखला देणे बंद झाले आहे. राज्यातील ज्या महिला पती पासून विभक्त राहतात अशा महिलांसाठी शासनाने संजय गांधी योजनेच्या लाभार्थी सूचीमध्ये परीतक्त्याना सुद्धा समाविष्ट केले आहे. यापूर्वी इचलकरंजी नगरपालिका कर विभागाकडून परीतक्त्या महिलेला दाखला देण्यात येत होते. परंतु इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना परीतक्त्या दाखला देण्याचे बंद झाले आहे. या अभावी या योजनेचा लाभ परीतक्त्त्या महिलांना घेता येत नाही.त्यामुळे इकडे पती सोडून दिल्यामुळे उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. व इकडे दाखला न मिळाल्यामुळे पेन्शनचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांचे जीवन जगणे मुश्कील झाले आहे. संजय गांधी निराधार समिती ने महानगरपालिका आयुक्तांना परीतक्त्या दाखला देने बाबत निवेदन दिले .
तसेच संजय गांधी निराधार समितीने महानगरपालिका आयुक्त श्री ओमप्रकाश दिवटे व उप आयुक्त तैमुर मुल्लाणी यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिली. व शासन निर्णय २० ऑगष्ट २०१९ चा आद्यादेश दाखवला. व इचलकरंजी महानगरपालिका परिक्षेत्रातील परीतक्त्त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा दाखला पडताळणी करून आपण द्यावा व तीन वर्षापासून या बोजनेपासून वंचित राहिलेल्या महिलेना न्याय द्यावा या आशयाचे निवेदन संजय गांधी निराधार अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या, व सदस्य सुखदेव माळकरी, कोंडीबा दवडते, तमन्ना कोटगी जय नागुरे, महेश ठोके, जयप्रकाश भगत, व शिवसेना इचलकरंजी प्रमुख भाऊसो आवळे यांच्य स्थीत देण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.