श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ‘सहकार महर्षी’ पुरस्कार प्रदान

शिरोळ :राम आवळे 
दि .१२ भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना यावर्षीचा भारतीय शुगरचा राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार शनिवार दि.१०  फेब्रुवारी रोजी सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे भारतीय शुगर सिंपोजियमच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कानपूर शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सहकार उद्योगाचे शिल्पकार राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व वसंतदादा पाटील यांच्या प्रेरनेतून सन १९७५ साली भारतीय शुगर या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे या संस्थेच्या स्थापने मागचा उद्देश हा सहकारी साखर कारखानदारीत येणारे नवनवीन तंत्रज्ञान कारखान्यापर्यंत पोहोचावे व या तंत्रज्ञानाची माहिती कारखानदारीतील प्रगत मनुष्यबळाला व्हावी असा होता. या संस्थेच्या वतीने दरवर्षी वार्षिक प्रदर्शन व परिषद आयोजित करून साखर कारखानदारी मध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना पुरस्कार देऊन गौरवले जाते.
उद्यान पंडित आणि क्षारपड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी सहकारी साखर कारखानदारी मध्ये आपले भारी असे योगदान देत असताना शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीचे उत्पादन घेता येण्यासाठी राबवलेली ऊस विकास योजना, सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, एकरी२००  टनाचे ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारावा या हेतूने सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी केलेले प्रयत्न, व शिरोळ तालुका आणि परिसरात सुमारे साडेआठ हजार एकरावर असणारे क्षारपड जमीन हाती घेतलेले क्षारपडमुक्त जमीन अभियानाचे दत्त पॅटर्न तसेच साखर कारखानदारी मध्ये नवीन तंत्रज्ञान राबविण्यासाठी केलेले काम या सर्व बाबींची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार त्यांना देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी पुरस्कार वितरण सोहळ्यास भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रम सिंह शिंदे,रणवीर शिंदे, एम जी जोशी दत्तचे व्हाईस चेअरमन अरुण देसाई कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सर्व संचालक मंडळ तसेच दत्त उद्योग समूहातील विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.