34 वां क्रीडा महोत्सव-भव्य कबड्डी स्पर्धा
34 वां क्रीडा महोत्सव-भव्य कबड्डी स्पर्धा
संगमेश्वर:
एकता क्रीडा मंडळ karambele यांच्यावतीने 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यत भव्य पंचक्रोशी व निमंत्रीत कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
कै.प्रकाश पवार क्रीडानगरी ग्रामपंचायत समोर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला ७०३४/-आणि चषक, द्वितीय ५०३४/- आणि चषक,तृतीय क्र. ३०३४/- आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय वैयक्तिक उत्कृष्ठ चढाई, उत्कृष्ठ पकड, उत्कृष्ठ खेळाडू आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी बाबू पवार,शरद पवार,नितीन पवार ,मकरंद पांचाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थापक श्री.उदय पवार यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.