इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मा.मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांना दिले निवेदन

यंत्रमाग अभ्यास समितीने सादर केलेल्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करणेबाबत निवेदन केली मागणी

इचलकरंजी :   हबीब  शेखदर्जी 

      दि ९ :आमदार मा.प्रकाशआण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मा.मुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांना यंत्रमाग अभ्यास समितीने सादर केलेल्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करणेबाबतचे निवेदन दिले. याप्रसंगी आमदार मा.प्रकाशआण्णा आवाडे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३ ते २०२८ साठीचे नविन वस्त्रोद्योग धोरण जाहिर केले. पण यामध्ये कांही बाबींची तरतूद राहून गेली होती. त्यासंदर्भात सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील आमदार व संबंधीत यंत्रमागधारक संघटना यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांचेकडे याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री यांनी मंत्री दादा भूसे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार रईस शेख, आमदार अनिल बाबर, आमदार प्रविण दटके यांची एक यंत्रमाग अभ्यास समिती स्थापन केली होती. यासमितीने महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचा सविस्तर अभ्यास करून व वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करून अहवाल मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस व मा.अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला आहे. त्या अहवालातील कांही मुद्दे उदा. मिनी टेक्सटाईल पार्क इ.ची घोषणा आंतरीक अर्थसंकल्पामध्ये झाली आहे. पण ऊर्वरीत बाबींची घोषणा व शासन निर्णय लवकरात लवकर करून यंत्रमाग उद्योगास महाराष्ट्र शासनाचे पाठबळ द्यावे यासाठी यंत्रमाग अभ्यास समितीने सादर केलेल्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी असे निवेदन आमदार मा.प्रकाशआण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन दिले.

यावेळी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अभ्यास समितीने सादर केलेल्या शिफारशींमधील २७ एच.पी. खालील यंत्रमागधारकांसाठी रू. १ प्रती युनिट अतिरिक्त  वीज सवलत व २७ एच.पी. वरील यंत्रमागधारकांसाठी ७५ पैसे प्रति युनिट अतिरिक्त सवलत देणेचे जाहिर केले.

सदर शिष्टमंडळात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील व संचालक पांडूरंग सोलगे यांचा समावेश होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.