श्री समर्थ सद्गुरु धोंडोपंत महाराज यांच्या स्मरणार्थ 11 ते 17 मे या कालावधीत अखंड नाम सप्ताह
यशवंत प्रोसेसचे व्हा. चेअरमन राजाराम बोंगार्डे यांची माहिती
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि १४ :येथील विक्रमनगर आरगे मळ्यातील श्री सद्गुरु भक्ती मंदिर याठिकाणी श्री समर्थ सद्गुरु धोंडोपंत महाराज भोसेकर (पंढरपूर) यांच्या स्मरणार्थ 11 ते 17 मे या कालावधीत अखंड नाम सप्ताह व सामुदाईक ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यशवंत प्रोसेसचे व्हा. चेअरमन राजाराम बोंगार्डे यांनी दिली.
ते म्हणाले, या सप्ताह काळात प्रात:काल ४ ते ५ सामदाईक ध्यान चिंतन, ५ ते ६ भुपाळ्या, काकडा आरती,६ ते ७ दैनिक पुजा,१०\ ते ११\ ज्ञानेश्वरी विषयक प्रवचन,११\ ते १२\ सांप्रदाईक भजन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ६.३० ते ७.३० ज्ञानेश्वरी विषयक प्रवचन, रात्रौ९ ते ११ हरिकिर्तन व रात्रौ११ वाजता सांप्रदायिक नित्यपाठ भजन असे कार्यक्रम होणार आहेत. 11 मे रोजी सकाळी 7 वाजता ध्वजारोहन, कलशपुजन, ग्रंथपुजन व वीणापुजन, दीपप्रज्वलीत करुन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहेत. शनिवार 11 मे रोजी सायंकाळी हभप परमेश्वर आबा भोसले (चिकलठाण) यांचे प्रवचन व रात्रौ हभप सुधाकर महाराज वाघ (पैठण) यांच किर्तन त्यानंतर सांप्रदाईक नित्यपाठाचा भजन होईल. रविवार 12 मे रोजी सायंकाळी हभप विलास मोरे सोलापूरकर यांचे प्रवचन व रात्रौ किरण महाराज बोधले (मानकोजी बोधले महाराज यांचे 11 वे वंशज) यांचे किर्तन त्यानंतर सांप्रदाईक नित्यपाठाचे भजन होईल. सोमवार 13 मे रोजी हभप सदाशिव बाबुराव म्हेत्रे (इचलकरंजी) यांचे प्रवचन व रात्रौ मच्छिंद्र महाराज लांडगे (नायगांव पुणे) यांचे किर्तन होईल. मंगळवार 14 मे रोजी हभप बापू पाटील महाराज (निमगांव) यांचे प्रवचन व रात्रौ हभप लक्ष्मण महाराज मेंगडे (पंढरपूर) यांचे किर्तन होईल. बुधवार 15 मे रोजी हभप अंबादास महाराज घरबडे मिरगव्हाण व हभप आदिनाथ महाराज पंढरपूरकर यांचे प्रवचन व रात्रौ हभप गणेश पाटील (पंढरपूर) यांचे किर्तन होईल. गुरुवार 16 मे रोजी हभप विष्णूपंत नेतले व हभप शमाताई आरगे (इचलकरंजी) यांचे प्रवचन व रात्रौ हभप गुरुवर्य शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर (उमेदपूर) यांचे किर्तन होईल. तर शुक्रवार 17 मे रोजी जगदीश महाराज कोल्हापूरकर यांचे प्रवचन व रात्रौ हभप गुरुवर्य शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर (उमेदपूर) यांचे काल्याचे किर्तन होईल.
शुक्रवार 17 रोजी सकाळी 8 वाजता अखंड नाम सप्ताह व सामुदाईक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता होईल. त्यानंतर 10 ते 11 सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज यांचे प्रवचन होऊन धोंडोपंत महाराज भोसेकर, श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्रीहरी पांडुरंग यांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बोंगार्डे यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.