कडवई बाजारपेठ जवळ बोध्दवाडी दिशेला जाणारा रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्ता वरील वाहतूक बंद
संगमेश्वर:नियाझ खान
दि .२० :सोमवारी संगमेश्वर तालुक्यात संध्याकाळी वादळी वाऱ्याच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले वादळी वाऱ्यामुळे तालुक्याच्या अनेक भागाती विविध रस्त्यांवर झाडे कोसळून पडली होती. यामुळे काही ठिकाणच्या रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.सोमवारी सायंकाळी ढगाळ वातावरण दिसून आले.संध्याकाळी चारनंतर विजांचा कडकडाट होऊ लागला आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.कडवई बाजारपेठे जवळ बोध्दवाडी दिशेला जाणारा रस्त्यावर झाड कोसळून पडले होते.पावसामुळे कडवई- घोसाळकर कोंड कडे जाणारा मुख्य रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळून पडले होते. यामुळे कडवई- घोसाळकर कोंड रस्त्यावरील वाहतूक पुर्णतः बंद झाली होती .रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे या दिशेला जाणारा वाहनांना पर्यायी मार्ग म्हणजे कडवई मोहल्ला विकास नगर मार्गाने जावे लागले.मात्र सात वाजेपर्यंत मार्ग बंदच होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.