आरजू टेक्सोल कंपनी” च्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन आरोपी अटक

रत्नागिरी:नियाझ खान 

दि २३: रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं.७६/२०२४ भा.द.वि.सं. चे कलम ४२० वगैरे अन्वये “आरजू टेक्सोल कंपनी” विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हयाची व्याप्ती लक्षात घेऊन अधिक तपास रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखा ह्यांच्याकडे दिला असून या गुन्ह्यामध्ये आता पर्यंत दोन इसमांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेस यश मिळाले आहे.
अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) संजय गोविंद केळकर, वय ४९ वर्षे, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा ता. जि. रत्नागिरी यास दि. २६/०५/२०२४ रोजी १८.३० वा. अटक करण्यात आलेली आहे व मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने दि. ३१/०५/२०२४ रोजी पर्यंत त्यास पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे.
2) प्रसाद शशिकांत फडके, वय ३४, वर्षे, रा. घर नं. ७२, ब्राम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, ता. जि. रत्नागिरी यास दि. २८/०५/२०२४ रोजी ००.१२ वा. अटक करण्यात आलेली आहे.
3) या मधील अन्य आरोपीत नजरेआड आहेत.
रत्नागिरी पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक केले आहे.
सदर प्रकरणी आजवर बळी पडलेल्या ११५ लोकांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत.
आपली तक्रार नोंदवू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत EOW कार्यालयात भेट देण्याची याद्वारे विनंती केली जात आहे.
कृपया संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून तुम्हाला मिळालेला कोणताही पत्रव्यवहार यासह सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणावित.
.जबाब नोदंविण्याकरिता ज्या नागरिकांनी संबंधित कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांच्या तक्रारी नोंदवण्याची इच्छा आहे अशा नागरिकांशी EOW जबाब नोंदविण्याकरीता भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी  टप्या-टप्याने संपर्क करून बोलावण्यात येईल.
सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा तसेच कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी. रत्नागिरी पोलीस दल प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक हाताळणी करण्यासाठी कटिबद्ध आहे.
कोणत्याही तातडीच्या शंका किंवा समस्यांसाठी, कृपया डायल ११२ वर अथवा आमच्या हेल्पलाइन नंबर +९१-९४२११३७३८० वर संपर्क साधावा. ज्यांची या कंपनी / इसमांकडून फसवणूक झाली आहे त्या सर्वांच्या साक्षी नोंदविण्यात येतील असे आवाहन पोलिस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×