मनोज साळुंखे फौंडेशनच्या वतीने सेवाभारती संचलित डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालयाची सहावी वर्षपूर्ती आणि इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इचलकरंजी:हबीब शेख दर्जी 

  दि ७ जुन: येथील मनोज साळुंखे फौंडेशनच्या वतीने सेवाभारती संचलित डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालयाची सहावी वर्षपूर्ती आणि इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि होतकरु गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी, मनोज साळुंखे व त्यांच्या फौंडेशनच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात आपल्याकडून अशा उपक्रमात सर्वतोपरी सहकार्य देऊ अशी ग्वाही दिली.
मनोज साळुंखे फौंडेशनच्या वतीने सातत्याने विविध समजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने दरवर्षी दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत कामगिरी करणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात येतो. यंदाही अशा गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार त्याचबरोबर होतकरु व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सेवाभारती संचलित डॉ. हेडगेवार फिरते रुग्णालयाची सहावी वर्षपूर्ती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, सेवाभारतीचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश पवार, संगांयो समिती अध्यक्ष अ‍ॅड. अनिल डाळ्या आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सत्कार व वह्यांचे वाटप करण्यात आले.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शिक्षक संजय परीट यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी  विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना त्यांच्या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे दिली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले, कोहिनूर बँकेचे चेअरमन धोंडीलाल शिरगांवे, भाजपा मागासवर्गीय महिला शहराध्यक्षा नागुताई लोंढे, द.भारतीय सेल जिल्हा संयोजक श्रीनिवास फुलपाटील, भाजपा बांधकाम कामगार शहराध्यक्ष दत्ता चव्हाण, विद्या सुतार, उत्तरेश्‍वर कांबळे, संजीवनी जगदाळे, शशिकांत कांबळे, सतिश पाटील, पापालाल उस्ताद, जहाँगिर पटेकरी, राजेश रजपुते, अनिल ठाणेकर, सतिश भस्मे, धनंजय दाहोत्रे, चांद जमादार, रवींद्र भांडे, वीरभद्र आडके, रमेश रामदिन, विवेक घुगे, दत्ता फुलपाटी, गणेश रामदिन, महादेव सातपुते, आनंदा कोळेकर आदींसह विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक व नागरिक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.