इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी श्री. सुहास अशोकराव जांभळे
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २५जून :इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी श्री. सुहास अशोकराव जांभळे यांची अभिनंदन निवड करण्यात आली . इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन जांभळे यांच्या निधनाने रिक्त झाली होती . जिल्हाध्यक्ष कै. नितीन अशोकराव जांभळे यांच्या रिक्त पदावर सदर निवड करण्यात आली. देशाचे नेते, माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार साहेब यांच्या ध्येय धोरणानुसार व पक्षाच्या उद्दिष्टानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहचले पाहिजे या उद्देशाने श्री . सुहास अशोकराव जांभळे यांची निवड करण्यात आलेली आहे..
. या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब यांच्या शुभहस्ते देण्यात आले.. यावेळी प्रांतिक सदस्य श्री मदन कारंडे , कार्याध्यक्ष उदयसिंह पाटील,नगरसेवक अब्राहम बापू आवळे, मंगेश कांबुरे, अमरजीत जाधव , राजू खोत, रवी कांबळे, शामराव कुलकर्णी , शिवाजी शिंदे, प्रवीण खाडे, नितिन कोकणे ,सचिन राणे, दशरथ माने, सुरेंद्र सपकाळ सर, ,आनंदा वाजे ,जनार्दन गोडसे ,अमोल भाटले, नागेश शेजाळे, नितीन क्षीरसागर ,संजय बडवे , पप्पू लोंढे,राजू भोसले, पिंटू आंबोलकर,किसन कोरवी , संभाजी सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.