कडवई च्या सुतारवाडीत पकडला 8 फूटी लांबीचा अजगर

कडवई :-मुुजीब खान

संगमेश्वर तालुक्यातील कडवई सुतारवाडी मधील महेश कडवईकर यांच्या घराच्या बाजूला ठेवलेल्या लाकडामध्ये लाकडे काडण्यासाठी गेले असताना 8 फूटी लांबीचा अजगर आढळला. त्यांनी वाडीतील सागर नांदळस्कर यांच्या माध्यमातून स्वराज्य संघटना कोकण संस्थापक अध्यक्ष अविनाश गुरव यांच्या मदतीने सर्प मिञ कुंडलिक आणि त्यांं चे चिरंजीव कमलेश पाटील यांना घेवून जागे वर जावून अजगराला पकडण्यात आले. नंतर त्यांनी अजगराला जंगलात नेऊन सोडले.
यावेळी वाडीतील राजु दादा नांदलस्कर , दत्ताराम कडवईकर, जगदिश कडवईकर, सागर नांदलस्कर, विशाल शीलकर होते. कडवई जिल्हा परीषद गटा मधील सर्प मिञ कुंडलिक , अमिर खान, असिम मोडक यांना कधी ही साप आल्याची बातमी मिळताच आपले काम धंदा सोडून लगेचच मदती साठी त्या जागी जावून आपल्या जीवाची पर्वा न करता विविध प्रकारच्या जातीचे साप पकडुन त्यांना जंगलामध्ये सोडतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.