इचलकरंजी: विजय मकोटे
आ.प्रकाश आवाडेंनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शुद्धपेयजल प्रकल्पासाठी सुमारे ४ कोटींचा निधी मंजूर करून आणला त्यानंतर नगरपरिषद स्वहिस्सा व अधिकची रक्कम असा सुमारे ५ कोटी रुपयांच्या आसपास असलेल्या प्रकल्पाचे काम अगदी संथगतीने सुरू आहे,शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून पुढील सणासुदीच्या कालावधीत पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते यानुसार तातडीने शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करावेत आणि शहरवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचतर्फे नगराध्यक्षा अलका स्वामी व मुख्याधिकारी डॉ प्रदीप ठेंगल यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी पेयजल प्रकल्पातून वाया जाणाऱ्या पाण्याची व्यवस्था कशी करणार तसेच पंचगंगा प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.नगराध्यक्षांनी प्रकल्प त्वरित सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत असून मुख्याधिकारी यांनी प्रकल्पाचे काम दर्जेदार होईल तसेच कुठेही अडचण वाटल्यास निदर्शनास आणून देण्याबाबत आवाहन केले.सामुग्री वापराबाबत थर्ड पार्टी ऑडिट होणार असल्याबाबत सांगितले.यावेळी उमेश पाटील,उदयसिंह निंबाळकर, राजु कोंनूर,दीपक जाधव,जतीन पोतदार,सचिन बाबर,दिपक पंडित, नागेश सूर्यवंशी, हरीश देवाडीगा, महेंद्र जाधव, विद्यासागर चराटे,अभिजित पटवा उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.