महाविकास आघाडीच्या वतीने हातकणंगले तालुक्यामध्ये कॅन्डल मार्च .

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी गावातील घटनेचा केला निषेध

हातकणंगले: अब्दुल नदाफ

हातकणंगले तालुक्यामध्ये शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी तिन्ही पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे शेतकरी यांनी काढलेल्या मोर्चा मध्ये भरधाव वेगाने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून चिरडण्याचा निर्दयी हत्याकांडचा निषेध करण्यासाठी हातकणंगले तहसीलदार ऑफिस पासून ते पंचायत समिती कार्यालय पर्यंत कॅन्डल मार्च कडून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली व झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.
११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद मध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने एक दिवस बंद ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया तसेच बंद मध्ये कोणतेही गालबोट लागू नये यासाठी शांततेने उद्याचा महाराष्ट्र बंद यशस्वी पार करण्यासाठी महाविकास आघडीच्या पदाधिकारी यांना सूचना शिवसेनेचे मा.आमदार व गोकुळ संचालक डॉ सुजित मिणचेकर यांनी केले.

यावेळी कॅन्डल मार्च मध्ये हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरूण जानवेकर शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर अरुण माळी उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे संदीप शेटे राजू पाटील विजय भोसले धोंडीराम कोरवी दीपक वाडकर अरविंद खोत रणजीत पाटील संदीप कांबळे अजित मोरे संदीप सूर्यवंशी संतोष कांबळे adv चिंतामणी कांबळे पप्पू मुरूमकर अविनाश जाधव मंदार गडकरी मोहन कोळेकर सुरेश भगत तसेच नगरसेवक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.