श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री जवाहर छाबडा .
श्री राजेंद्र राशिनकर यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड...
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १३ – येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री. जवाहर दौलतराम छाबडा व उपाध्यक्षपदी श्री. राजेंद्र रामचंद्र राशिनकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
ही निवड दिनांक ११ ऑक्टोंबर २०२१रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री अरविंद व्यंकटेश कुलकर्णी हे होते. निवडीनंतर नूतन अध्यक्ष श्री जवाहर छाबडा व उपाध्यक्ष श्री. राजेंद्र राशिनकर यांचा सत्कार करण्यात आला. सदर सभेस सर्व संचालक मंडळ व सेवक वर्ग उपस्थित होता.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.