समस्त मुस्लिम समाज कडून शिवतीर्थ लोकार्पण सोहळ्यात उदंड प्रतिसाद

_घोडे,रथ,बघी, ढोल ताशे,लेझिम पारंपरिक लवाजम्यासह मिरवणूक_

इचलकरंजी – प्रतिनिधी
           येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण श्री शिवतीर्थ लोकार्पण सोहळा अगदी दिमाखदार पार पडला.सदर सोहळ्यास समस्त मुस्लिम समाज इचलकरंजी,कबनुर,परिसर कडून हजारच्या संख्येने उपस्थित होते.घोडे,रथ, बघी,ढोल ताशे,लेझिम,सह पारंपरिक वाद्य,मावळे प्रतिकृती व आकर्षक हार घेऊन सर्वांनी शिवाजी महाराज की जय! चा जयघोष करीत रॅली द्वारे मिरवणुकीत सहभागी झाले.सर्व धर्मीय नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित राहून एक राष्ट्रीय एकात्मता चे दर्शन दिले असल्याचे सर्व स्तरातून भावना व्यक्त होत आहे.
सदर कार्यक्रमस्थळी समस्त मुस्लिम समाजच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचे शाल,सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.श्री शिवतीर्थ लोकार्पण व सुशोभिकरण मध्ये ज्यांचे ज्यांचे मोलाचे योगदान लाभले असे खासदार,आमदार,नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,सभापती सर्व ,सर्व शिवतीर्थ कमिटी यांचा सत्कार समस्त मुस्लिम समाज कडून समाजातील ज्येष्ठ लोकांच्या वतीने करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.