Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.१७:एखाद्या विद्यार्थ्यांचे पालक वारले तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाल्यांना प्रति महिना ४००० रुपये मिळणार आहे अशी खोटी जाहिरात शाळेच्या नोटीस बॉर्डर लावून महाराष्ट्र शासनाची व पालकांची दिशाभूल, फसवणूक व खोटी माहिती प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईगडे यांना निवेदन सादर केले असून मुख्याध्यापिका सौ. ए. एम कांबळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्या महिलांच्या पतीचे दिनांक ०१ मार्च २०२० 0 नंतर निधन झाले आहे किवा पाल्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झालेले आहे. अशा मुलांना महाराष्ट्र शासनामार्फत प्रतिमाह ४००० /- रुपये देण्यात येणार आहे. याबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यामधील इतर तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असून सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट किंवा जिल्हा परीविक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावेत अशा आशयाची जाहीर नोटीस इचलकरंजी शहरातील एका नामवंत हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. ए. एम. कांबळे यांनी शाळेच्या बोर्डावर लावलेल्या आहेत.
याबाबत महिला व बाल विकास अधिकारी, हातकणंगले तहसील कार्यालय येथे प्रत्यक्ष जाऊन संपर्क केला याठिकाणी येथील अधिकारी सौ. लता पाटील यांची भेट घेऊन वरील योजनेबाबत माहिती विचारली असता वरील अशा प्रकारची कोणतीच योजना अस्तित्वात नाही किंवा शासनाने जाहीर केलेली नाही असे सांगण्यात आले.
सदरच्या नोटीस ची खोटी जाहिरात एकाच दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे. या खोट्या जाहिराती मुख्याध्यापिका सौ. सौ. ए. एम. कांबळे यांनी महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार, महिला व बालविकास विभाग तसेच पालकांची दिशाभूल केली आहे, नागरिकांना खोटी माहिती दिली आहे . याबाबत शाळेमध्ये जाऊन आम्ही माहिती घेतली तर सदर मुख्याध्यापिका यांच्याबाबत पालकांच्या अनंत तक्रारी आहेत. त्या पालकांशी उद्धट पणे बोलतात. एखादी तक्रार यांना सांगायला गेल्यास पालकांची तक्रार न ऐकता माझचं ऐकल पाहिजे असा त्यांचा हट्टॆखोर स्वभाव आहे.
त्यामुळे मुख्याध्यापिका सौ. ए. एम. कांबळे यांनी गंभीर गुन्हा केलेला आहे. यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व भारतीय दंड संहिता नुसार त्यांना निलंबित करावे व फसवणूक केल्याबाबत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी मा. जिल्हाधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर, शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, विभाग कोल्हापूर, यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.