ग्रंथपाल दिनानिमित्त श्रीमंत गंगामाई शाळेच्या विद्यार्थिनींची आपटे वाचन मंदिराला भेट
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .१९ :भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या औचित्याने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी व प्रत्येक वर्गाच्या ग्रंथालय प्रमुखांनी हातकणंगले तालुक्यातील ‘अ’ वर्ग वाचनालय असणाऱ्या आपटे वाचन मंदिराला अभ्यास भेट दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षिका सौ. व्ही. एस. लोटके व पर्यवेक्षक श्री. एस. एस. कोळी यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थिनींना ग्रंथालयाचे महत्त्व व वाचन संस्कृतीचे जीवनातील स्थान यावर मार्गदर्शन केले.
आपटे वाचनालयातील सेवक के. बी. पंढरपुरे यांनी इंग्रजी, हिंदी, कलादालन आदी विभागांची माहिती देत विद्यार्थिनींना संपूर्ण वाचनालय दाखविले. बालविभागात विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष पुस्तक वाचनाचा आनंद घेतला.
यानंतर आपटे वाचन मंदिराचे कार्यवाह एम. डी. पुजारी यांनी वाचनालयाचा इतिहास सांगत विद्यार्थिनींना गोष्ट कथन करून वाचनाची गोडी लावली. ८० हजार पुस्तकांचे हे दालन सर्वांसाठी खुले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी वाचनालयातील ग्रंथालय सेवकांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आर. एस. रॉड्रीग्युस यांनी केले तर ग्रंथपाल एस. एस. नेजे यांनी आभार मानले. या वेळी उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही. एस. लोटके, ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक डी. डी. कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.