इचलकरंजीचे ज्येष्ठ फोटोग्राफर अनंतसिंग राजपूत यांचा ८४वा वाढदिवसानिमित्त सत्कार

इचलकरंजी: विजय धुत्रे 

दि  ९ :  इचलकरंजीचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री. अनंतसिंग राजपूत यांच्या अनंत चतुर्थी दिनी झालेल्या ८४व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाशराव आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसेच इचलकरंजी महापालिका आयुक्त सौ. पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी राजपूत यांचे इचलकरंजीतील छायाचित्र क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.