जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींची बाजी

श्रेया जाधव प्रथम, समीक्षा लवटे द्वितीय; विभागीय स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी : विजय मकोटे 
दि ४ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय वेटलिफ्टिंग स्पर्धा मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी वंदे मातरम मैदान येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी प्रभावी कामगिरी करत विजेतेपदाची बाजी मारली.५८ किलो वजनगटात इयत्ता आठवीतील श्रेया अमोल जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर ४८ किलो वजनगटात इयत्ता सहावीतील समीक्षा सागर लवटे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. या दोन्ही खेळाडूंची आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

        या यशामागे श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवासजी बोहरा शेठ, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाइस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकर, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर, तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.

               प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ. व्ही. एस. लोटके, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षक श्री एस. एस. कोळी आणि ज्येष्ठ शिक्षक श्री डी. डी. कोळी यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.या स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी जिमखाना प्रमुख श्री बी. एस. माने सर, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक उत्तम मेंगणे सर व क्रीडा शिक्षक के. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

       श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेचा गौरव द्विगुणित झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.